Manavdhan
Manavdhan

Events & Activities

OUR EVENTS

Where Learning Comes Alive

Search upcoming and past symposiums, social drives, and cultural activities across our campuses.

Raksha Bandhan
Social Events 📍 Pathardi Phata, Nashik

Raksha Bandhan

As part of Raksha Bandhan celebration, students visited various Government offices and public service departments, including the Police Department, Post Office, Army, and Fire Department. The students also extended the spirit of Raksha Bandhan to auto-rickshaw drivers, fruit vendors, garbage collection workers, and other members of the community who contribute to the smooth functioning of society every day.

View Gallery & Videos →
27 AUG 2026
Founder's Day Celebration
Other Events 📍 Pathardi Phata, Nashik

Founder's Day Celebration

अरे माणसा, उठ तू जागा हो!’ पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन; मानवधन संस्थेचा २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

View Gallery & Videos →
05 JUN 2026
चित्रकला स्पर्धा
Other Events 📍 Dhanlaxmi School , Pathardi Phata, Nashik

चित्रकला स्पर्धा

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनशीलता आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने खुल्या चित्रकला स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. संस्थेतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या चित्रांमधून सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना कलात्मक अभिव्यक्तीसाठी एक अर्थपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच, भारतातील या दोन महान राष्ट्रीय नेत्यांचे प्रेरणादायी जीवन, मूल्ये आणि राष्ट्रासाठीचे योगदान यांचा विचार करण्याची संधी या उपक्रमातून मिळाली.

View Gallery & Videos →
02 OCT 2026
Dr. Vija Bhatkar Birth Anniversay
Other Events 📍 Pathardi Phata, Nashik

Dr. Vija Bhatkar Birth Anniversay

On the birth anniversary of Dr. Vijay Bhatkar, the visionary architect of India’s PARAM Supercomputer, we pay tribute to his remarkable contribution to science, technology, and the digital transformation of our nation. His inspiring journey motivates young minds to innovate, research, and contribute towards a self-reliant and technologically empowered India. Manavdhan Samajik Shaikshanik Vikas Sanstha, Nashik, salutes his visionary leadership and invaluable service to the nation. Inspiring Innovation, Empowering India!

View Gallery & Videos →
10 OCT 2026
Dr, APJ ABDUL KALAM Birth Anniversary
Other Events 📍 Pathardi Phata, Nashik

Dr, APJ ABDUL KALAM Birth Anniversary

निसर्ग हाच खरा मार्गदर्शक आणि प्रयोगशाळा-डॉ. अरविंद नातू यांचे मानवधन संस्थेतील वैज्ञानिक व्याख्यानमालेतील वक्तव्य भारतरत्न, मिसाईल मॅन आणि जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक यांच्या वतीने ११ व्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER), कोलकाता या संस्थेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ .अरविंद नातू, पिंपरी-चिंचवड नॅशनल सायन्स पार्क सी.ई.ओ, शिक्षणाधिकारी, राज्य समन्वयक N.C.S.C . नंदकुमार कसार, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ओम प्रकाश कुलकर्णी, मानवधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश कोल्हे, संस्था सचिव ज्योती कोल्हे व सर्व शाळेचे मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. अरविंद नातू यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी ‘निसर्गापासून आपण काय शिकतो’ या विषयावर मार्गदर्शन करताना निसर्ग हा विज्ञानाचा खरा गुरु आहे. विद्यार्थ्यांनी निसर्गाचे निरीक्षण करून जिज्ञासा व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकाश कोल्हे यांनी पुढच्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी आणि राष्ट्र विकासाच्या उज्वल भविष्यासाठी ही वैज्ञानिक व्याख्यानमाला आयोजित करत असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करणे आणि जिज्ञासू वृत्ती जोपासणे यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून संशोधन क्षेत्रात प्रगती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मानवधन संस्थेचे संस्थापक डॉ. प्रकाश कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि संस्था सचिव ज्योती प्रकाश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात वैज्ञानिक व्याख्यानमाला सुरू करणारी व अकरा वर्षापासून अखंडित वैज्ञानिक व्याख्यानमाला सुरू असलेली मानवधन ही प्रथम व एकमेव संस्था आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी ,पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अपर्णा कुलकर्णी व रोहित पगारे यांनी केले.

View Gallery & Videos →
15 OCT 2026